दुर्दैवी! फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत मृत्यू

औरंगाबाद।आपण प्रत्येकवेळी बोलताना बोलून जातो की, कोणाचे कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र हे खरं आहे. कारण आपल्या समोर जरी मृत्यू घोंगावत असला तरी आपल्याला त्याची चाहूल लागत नाही. अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. फुगे विकून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बापलेकीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फुगे विकून झाल्यावर वडील, मुलगी आणि मुलीचा मामा असे तिघेजण दुचाकीवरून खुलताबादवरून औरंगाबादच्या दिशेने येत होते. मात्र अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीला जोरदार टक्कर मारली व यामुळे दुचाकीवरील तिघंही लांब फेकले गेले.

दुचाकीवरून 23 वर्षीय मोनिका गणेश रेनवाला, वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी (वय-40) आणि मोनिकाचे मामा बद्री साईदास जाधव (वय-45) हे तिघे प्रवास करत होते. दुचाकीला जोरदार धडक लागल्याने 23 वर्षीय मोनिका गणेश रेनवालचा मृत्यू झाला आहे. तर वडील व मामा गंभीरीत्या जखमी झाले. मात्र रविवारी सकाळी मोनिकाचे वडील ज्ञानेश्वर यांचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या मामा बद्री यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे आता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला. पण रुग्णवाहिकेला घटनास्थळी येण्यास सधारणतः 50 मिनिटे उशीर झाला.

तोपर्यंत जखमीचं बरंच रक्त वाया गेले. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमींना त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी वडील ज्ञानेश्वर यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या बातम्या
कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी खास ऑफर; देत आहेत, कार, सोने आणि आयफोन
VIDEO; पंगा गर्ल कंगनाची पुन्हा चर्चा रंगली, भर पावसात करतेय जबरदस्त घोडेस्वारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, चर्चांना उधाण
हनिमूनला गेल्यावर पत्नीला बसला जबर धक्का; आता नवरा बनणार नवरी, वाचा पूर्ण प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.