बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ मोठ्या कंपनीत १० हजार पदांची भरती, विदेशात जाण्याची संधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामुळे अनेक नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्या आयटी क्षेत्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

यूएसटी या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स कंपनीने यंदा भारतासह जगभरातील त्यांच्या कार्यालयांमध्ये तब्बल १०,००० पेक्षा अधिक नवीन कर्मचारी नोकरीवर घेण्याची घोषणा केली आहे. यूएसटी ग्राहकांना मानव-केंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या व्यवसायात बदल करण्यासाठी मदत करणार आहे.

त्यादृष्टीने कंपनीने ही कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. यूएसटी कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात २ हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील.

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे. अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मॉडर्नायझेशन, AI/ML, ऑटोमेशन (RPA/IPA) याचे ज्ञान असणे हे मुख्य कौशल्य ठरेल.

याबबत ‘यूएसटी’चे जॉइंट चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मनू गोपीनाथ यांनी सांगितले की, आमचे नवीन कर्मचारी नवीन तंत्रज्ञानावर काम करतील आणि अशी उत्पादने विकसित करतील जी आमच्या ग्राहक कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतील. कंपनीची सध्याची उत्पादने आणखी विकसित करण्यासाठीही हे नवीन कर्मचारी काम करतील.

आमच्या उत्पादनांची मागणी वाढेल असे प्लॅटफॉर्म्स निर्माण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असेल. ही नवीन कर्मचारी भरती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोपसह आशिया पॅसिफिक देशांमध्ये केली जाणार आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये भारत, इस्रायल, मलेशिया आणि सिंगापूर येथून कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल.

ताज्या बातम्या

MPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेचं आयोजन

महाराष्ट्राची अप्सरा मालदीवमध्ये! समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक; फोटो व्हायरल

‘आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.