उंड्रीतील पहिल्या महिला सरपंचाचे निधन, आईची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुलींनीच खांदा देत केले अंतिम संस्कार

उंड्री गावच्या पहिल्या महिला सरपंच शारदा मोहन होले यांचे अकाली निधन झाले आहे. त्या उंड्रीतील प्रसिद्ध महिला उद्योजक, माजी कृषी बाजार समितीच्या उपसभापती, शारदा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षाही होत्या. मुलगा नसल्याने त्यांच्या पार्थिवाला मुलींनीच खांदा दिला आहे.

शारदा यांनीच आपले अंतिम संस्कार मुलींनीच करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे सामाजिक रुढी परंपरांना फाटा देत त्यांच्या मुलींना पार्थिवाला खांदा दिला आहे आणि त्यांचे अंतिम संस्कारही केले आहे. निकीता शेवते आणि प्राजक्ता वाकचौरे असे या मुलींचे नाव आहे.

शारदा होले यांनी अनेक महिलांना महिला उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला होता. उंड्री परिसरात त्यांनी आपली ओळख राजकारणी म्हणून नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून निर्माण केली होती.

शारदा होले यांच्या अचानक अकाली निधनाने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शारदा होले यांच्या जाण्याने उंड्री एका चांगल्या व्यक्तिमत्वाला मुकली असल्याचे राजेंद्र भिंताडे यांनी म्हटले आहे.

शारदा होले यांच्या निधनानंतर अंतिम संस्कारावेळी पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील नागरीक यावेळी उपस्थित होते. शारदा यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शारदा यांच्या मागे पती, दोन मुली, जावई, दिर, जावा, पुतणे आणि नातू असा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऍक्टींग सोडून राजकारणात उतरणार पंगा क्वीन; सांगितला आपला फ्युचर प्लॅन
PI संजय निकम यांची पत्रकारांवर दादागिरी; लालबागच्या राजाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना केली धक्काबुक्की
ज्यांना पोसलं, लहानच मोठ केलं तेच डोक्यावर बसून…; कृष्णा अभिषेकवर भडकली गोविंदाची बायको…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.