वाह, क्या बात! काकांचा चमत्कार पाहून डोळे उघडेच राहतील, भन्नाट जादूचा व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावर ठिकठिकाणी लोक आपलं कौशल्य दाखवताना दिसतात. या माध्यमातून ते स्वत:च पोट भरतात. परंतु ते विशिष्ट भागातच मर्यादित राहतात. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक या कला असणाऱ्या कलाकारांना सर्वांपर्यंत पोहचवतात. असाच एक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक काका जादू दाखवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अश्चर्यचकीत करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये बॉल आणि सिक्क्याचा वापर करत जादूचा चमत्कार दाखवत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला गेला आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिले आहे की, ‘’चला काकांना अजून प्रसिद्ध करूया, शानदार टॅलेंट!’’

हा व्हिडीओ पाहताना तुमचेही डोळे उघडेच राहतील. तुम्ही या काकांच्या जादूचा व्हिडीओ दोन-चार वेळा पाहिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्यांने #Incredibleindia हा हॅशटॅग वापरला आहे. ही जादू पाहून काकांना अजून प्रसिद्धी मिळावी अस नेटकरी म्हणत आहेत.

व्हिडीओत काका एक छोटा बॉल आणि सिक्काच्या साहाय्याने जादू करत आहेत. त्यांची कलाकारी पाहून नेटकरी चक्रावले आहेत. लोखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. निवांत दिसणारे काका सहज आणि सोप्या पद्धतीने जादू दाखवत आहेत त्यांच्या या सहजपणाचं कौतुक केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
बंद पडली होती कार, पठ्यानं अस देशी जुगाड केलं की आनंद महिंद्राही झाले फिदा; पाहा व्हिडीओ
 तुला कापू का? कोंबडी म्हणते नको-नको, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
किती ते प्रेम! जेनेलियाने चावला रितेशचा कान, म्हणते प्रेमात पुर्णपणे वेडी झाली आहे; पाहा व्हिडीओ
देशात ‘टिकैत फॉर्मूला’ लागू करा; शेतकरी नेत्याच्या ‘या’ मागणीने मोदी सरकारला फुटला घाम..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.