कॅन्सरग्रस्त नट्टू काकांनी व्यक्त केली त्यांची शेवटची इच्छा, वाचून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी

मुंबई। लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांतील अनेक कलाकारांनी प्रत्येकाच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे गेले कित्येक वर्ष हि मालिका लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जात आहे.

अशातच चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारे फेम अभिनेते घनश्याम नायक म्हणजे ‘नट्टू काका’ सध्या कॅन्सरच्या विळख्यात सापडले आहेत. ते सध्या कॅन्सरवर उपचार घेत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी शूटींग पासून ब्रेक घेतला होता. गेल्या काही महिन्यांपासून घनश्याम नायक कोरोनामुळे शूटिंगपासून दूर होते.

एप्रिल महिन्यात ‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणार्‍या ‘तारक मेहता..’च्या या ज्येष्ठ अभिनेत्याच्या मानेवर काही डाग दिसू लागले, त्यानंतर डॉक्टरांना कॅन्सर झाल्याची पुष्टी केली. ज्यासाठी ते सध्या केमोथेरपी घेत आहे. सध्या ते पूर्णपणे ठीक आहेत. आणि मुंबईत पुन्हा शुटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहे.

मात्र नट्टू काका आजाराने त्रस्त असले तरी ते जोपर्यंत या दुनियेत तोपर्यंत त्यांना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, तारक मेहताच्या कलाकारांसोबत काम करणे मला खूप आवडते.

ते पुढे म्हणाले की, मला खात्री आहे की मी 100 वर्षे जगणार आहे आणि मला काहीही होणार नाही. घनश्याम नायक यांना असे वाटेत की, कोरोनाला घाबरून घरी बसण्यापेक्षा काळजी घेऊन काम केले पाहिजे.

ते म्हणतात, मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि मरताना देखील चेहऱ्यावर मेकअप घेऊन जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या
थरारक! रस्त्यावर सायकलवरुन पडला तरूण, उठण्याचा प्रयत्न करताच मागून कार आली अन्… पहा व्हिडिओ
त्याने माझे क्लिवेज आणि मांड्यांना…; सुरवीन चावलाने सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव
डेल्टा + चा धोका! राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार
ब्रेकिंग! अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, आता कार्यकारिणीत मांडला जाणार ठराव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.