अफवा पसरवनाऱ्यांवर नट्टू काका चिडले, म्हणाले, मी कोणत्याही आर्थिक संकटात नाही

मुंबई । कोरोना महामारीमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण सध्या बंद आहे. मात्र याबाबत उलटसुलट अफवा पसरवल्या जात आहेत. यामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक हे आर्थिक संकटात असल्याची चर्चा होती.

मात्र यावर ते आता चांगलेच भडकले आहेत. त्यांनी स्वतः यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शोमधून ब्रेक घेतला नाही. सध्या मुंबईत शूटिंगला बंदी असल्याने या मालिकेचे शूटिंग काही दिवसांकरिता थांबवले आहे. याबाबत कोणीही अफवा पसरवू नका, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात सप्टेंबर महिन्यात घनश्याम यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांनी काही वेळ मालिकेतून ब्रेक घेतला होता. यावेळी ते आर्थिक संकटात असल्याच्या अफवा येत होत्या. यावर ते आता चांगलेच चिडले गेले आहेत.

मी आर्थिक संकटात नाही. मी माझ्या नातवंडांसोबत मी घरी चांगला वेळ घालवतोय. मी गरजूंची मदत देखील करतोय. मी बेरोजगार नाही आणि कोणत्याच आर्थिक संकटात देखील नाही, असे त्यांनी स्पष्ठ केले आहे.

तसेच ते म्हणाले, लोकं इतकी नकारात्मकता का पसरवतात हेच मला कळत नाही. मी मालिकेतून ब्रेक घेतलेला नाही. कोरोनामुळे ज्येष्ठ कलाकार महाराष्ट्राबाहेर जाऊनही शूटिंग करू शकत नाहीत. आम्ही सर्व नियम काटेकोरपणे पाळतोय.

शूटिंगला परवानगी मिळताच मीसुद्धा काम पुन्हा सुरू करेन, यामुळे अफवा पसरवू नका. ते इतरही हिंदी मालिका करत असतात. यामुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट असल्याचे बोलले गेले तेव्हापासून ते चर्चेत आहेत.

ताज्या बातम्या

वाद-विवादाचे भंडार आदित्य नारायण म्हणण्यास हरकत नाही, जाणून घ्या त्याचे आजवरचे वादविवाद

करण जोहरच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून तुमची झोप उडेल; आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

चंपकलाल रोल नाकारून मिळाला जेठालाल रोल; वाचा कसे पोहचले जेठालाल घरोघरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.