आता तर युनो देखील म्हणतंय, ‘गांजा ड्रग्स नव्हे तर औषध; भारतानेही दिले समर्थन

दिल्ली | गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ऐतिहासिक मतदानानंतर हा निर्णय घेण्यात आला.

अंमलीपदार्थ आयोगाने बुधवारी हा निर्णय घेतला. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्यानंतर आयोगाने गांजाला धोकादायक यादीतून हटवले आहे. यामध्ये भारतासह २७ देशांनी गांजाला धोकादायक यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले आहे पण उरलेल्या देशांनी या निर्णयाच्या विरोधात मतदान दिले आहे.

यामध्ये चीन, पाकिस्तान आणि रशिया या देशांचा समावेश आहे. या निर्णयानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे UN चं म्हणणं आहे.

या निर्णयामुळे गांजा किंवा भांगपासून बनवलेल्या औषधांचा वापर वाढण्याची शक्यता आहे. आता अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबत आपल्या पॉलिसीमध्ये बदल करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या विषयावर खूप चर्चा रंगली होती. कॅनडा, अमेरिकेतल्या १५ राज्यांमध्ये वैद्यकीय कारणासाठी गांजा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतानेसुद्धा UN च्या या निर्णयाला समर्थन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

जिंकलस भावा! क्रिकेट किट लांबच साधा बॉल खेळायला मिळत नव्हता, आता बनला यॉंर्कर किंग!

‘आईचा अपमान सहन करणार नाही, जाहीर माफी माग’, कंगनाला भाजपने सुनावले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.