हवेमार्फत वाढणारा कोरोना प्रसाराचा धोका होणार कमी? शास्त्रज्ञांनी शोधला उपाय

मुंबई | दिवसेंदिवस करोना विषाणूने चांगलेच हातपाय पसरले आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन अनेक ठिकाणी पूर्णपणे होताना दिसून येत नाही. यामधून आता हवेमार्फत वाढणारा कोरोना प्रसाराचा धोका अधिकच वाढला आहे.

यावर शास्त्रज्ञांनी एक उपाय शोधला आहे. एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

जिथे सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही अशा बंद खोल्यांमध्ये कोरोना विषाणू एअरोसोलच्या माध्यमातून पसरून संक्रमित करू शकतो. अशावेळी एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना विषाणूला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असे नव्या संशोधनातून पुढे आले आहे.

दरम्यान, अनेक वर्षांपासून सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी यूव्हीसी प्रक्रिया वापरली जाते. मात्र याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. परंतु, त्या तुलनेत कमी क्षमतेची far-ultraviolet C (UVC) सुरक्षित असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत.

यूकेमधील क्रॅनफिल्ड विद्यापीठातील लिआंग यांग म्हणतात, ‘या पद्धतीने हवेतील विषाणूंचा नाश करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. जिथं हवा खेळती राहू शकत नाही. तिथे फार-यूव्हीसी इल्युमिनेशनचा कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी तितकाच उपयोग होईल जितका N95 मास्कचा होतो.’

महत्त्वाच्या बातम्या
‘मुंबई महापालिक निवडणूक असो की महाराष्ट्रातील निवडणूक, आम्ही एकत्र राहू’
डॉ. शीतल आमटे आत्मह.त्या प्रकरणात धक्कादायक माहिती; कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्मह.त्या?
लसीचा डोस घेतल्यानंतरही करोना का झाला? भारत बायोटेकने सांगितलं कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.