Share

गोळी लागलेल्या जखमी भारतीय तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कहाणी ऐकून काळजाचा थरकाप उडेल

Ukren-Indian-student

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान युक्रेनमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(ukren indian student video viral )

हा व्हिडिओ युक्रेनमधील एका भारतीय विद्यार्थ्याचा आहे. हा विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याने रुग्णालयातून एक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये हा विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्याने युक्रेनमधील भयंकर परिस्थिती सांगितली आहे.

“मी युक्रेनमधील रेल्वे स्टेशनला गेलो. पण ट्रेनचे तिकीट मिळेना, मग टॅक्सी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी टॅक्सीवाल्यांनी अवाच्या सव्वा भाडे घेतले. आम्ही तब्बल एक हजार डॉलर घेऊन टॅक्सी घेतली. आम्ही तीन जणांनी टॅक्सी शेअर केली. मात्र तीन चेक पोस्ट पार केल्यानंतर आम्हाला परत पाठवण्यात आले”, असे त्या विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

आम्हाला उद्या ट्रॅव्हल करा असे सैनिकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही कीव शहरात परत आलो. त्यानंतर गोळीबार सुरु झाला, अशी व्यथा त्या तरुणाने मांडली आहे. या व्हिडिओमध्ये त्या तरुणाने युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीची माहिती देखील दिली आहे. गेल्या सात दिवसांपासून युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे.

त्या विद्यार्थ्याने व्हिडिओमध्ये पुढे सांगितले आहे की, ” कीवमध्ये परतल्यावर गोळीबार वाढला. तीन चार लोक जमिनीवरून आणि तीन चार लोक बिल्डिंगवरून फायरिंग करत होते. यावेळी मला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी माझ्या छातीत लागली. त्यावेळी मी बेशुद्ध झालो. त्यानंतर मला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.”

“मी दिल्लीचा राहणारा आहे.शुद्धीवर आल्यानंतर पहिला फोन मी आईला केला. मला भारतात येण्याची इच्छा आहे. मी भारताच्या दूतावासाशी संपर्क साधला. पण त्याचे आधीच स्थलांतर झाले आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करत आहे. मला कसेही बॉर्डर क्रॉस करून द्या. मला मदत करा”, असे आवाहन विद्यार्थ्याने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
झुंड चित्रपटासाठी पडद्यामागचा हिरो ठरला आमिर खान, बिग बींना काम करण्यासाठी केले राजी
PHOTO: सिल्कच्या साडीमधील जया बच्चन यांचे सौंदर्य पाहून सगळेच झाले थक्क, ऐश्वर्याही पडली फिकी
भारतीय संस्कृती: पाकिस्तानी मुलीला बॉम्बपासून वाचवले आणि सुखरूप तिच्या वडिलांकडे पोहोचवले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now