Share

VIDEO: युक्रेनच्या सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, रशियाचा क्रूर चेहरा आला जगासमोर

Ukren-Cycle.

सध्या रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ला करत त्यांचे ७४ लष्करी तळ उध्वस्थ केले आहेत. युक्रेनमधील या विध्वंसाची दृश्ये समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्याचा फटका आता युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.(Ukren cycle rider bomb video )

रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेल्या कीव(Kiv) शहरावर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिक देखील मारले जात आहेत. अशात रशियाने कीव शहरावर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रशियाचा युक्रेनविरोधातील आक्रमकपणा दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये एक सायकलस्वार रस्त्याने जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने व दुकाने आहेत. यादरम्यान, अचानक हवेतून बॉम्ब हल्ला होतो. या हल्ल्यामुळे त्या सायकलस्वारच्या चहुबाजूने आगीच्या ज्वाला उठतात. हा व्हिडिओ फक्त ४० सेकंदाचा आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.

https://twitter.com/realistqx1/status/1496757503195029508?s=20&t=6OWjdgvO3lUkWZJQcJJpVw

युक्रेनमधील सर्वसामान्य जनतेचा या युद्धामध्ये कसा नाहक बळी जात आहे, हे या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर धूर आणि आगीच्या ज्वाला निघताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सायकलस्वार जमिनीवर पडलेला आणि वेदनेने ग्रासलेला दिसत आहे. त्यानंतर काही काळाने त्याचा मृत्यू होतो.

युक्रेन सध्या मोठया संकटातून जात आहे. रशिया युक्रेनवर मिसाईल आणि रॉकेटच्या माध्यमातून हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील १३७ लोक मृत्युमूखी पडले आहेत. तसेच शेकडो लोक जखमी देखील झाले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये हाहाकार माजला आहे.

या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले जात आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरातून पळत आहेत. युक्रेनमधील लोक देश सोडून स्थलांतर करत आहेत. युक्रेनमधील नागरिकांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
..जेव्हा मायकल जॅक्सनने राज ठाकरेंना दिले होते तब्बल ४ कोटी रुपये, वाचा पुर्ण किस्सा
प्रियंका चोप्राने शेअर केला युक्रेनमधील परिस्थितीचा भावनिक व्हिडीओ, हल्ल्याच्या निषेध करत म्हणाली..
प्रिय पुतिन, जर मी तुझी आई असते तर..,रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर व्हिडीओ बनवल्याने अभिनेत्री ट्रोल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now