Ujjwal Nikam : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना दोन नवीन नावं आणि चिन्ह दिली आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणूक आयोगाने हा तात्पुरता निर्णय घेतला आहे.
यावेळी ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” असे, तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव देण्यात आले आहे. तसेच ठाकरे गटाला धगधगत्या मशालीचे चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून सुचवण्यात आलेल्या तीन चिन्हांपैकी एकही चिन्ह निवडणूक आयोगाने निवडले नाही व त्यांना पुन्हा तीन चिन्ह देण्यास सांगण्यात आले आहे.
या सगळ्या प्रकरणावर जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, निवणुकीमधील कुठलं चिन्ह राजकीय पक्षाला द्यावं याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत निवडणूका या पारदर्शी आणि कुठलाही प्रलोभनाला बळी न पडता व्हायला हव्या.
यासाठी राजकीय पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह कुठलं असावं, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो, असे ते म्हणाले. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला तीन निवडणूक चिन्ह निवडण्याची मुभा असते. त्यातील एक निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग निश्चित करत असतो, असेही ते म्हणाले.
तसेच शिंदे गटाने जी तीन चिन्हे निवडलेली आहेत, ती निवडणूक आयोगाच्या सूचीमध्ये नसल्याने त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. तसेच त्यांना सूचीमधील तीन निवडणूक चिन्ह निवडण्यास सांगितले आहे, असे उज्वल निकम यांनी सांगितले.
मात्र, उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवते की, रद्द करते याबाबत आपल्याला सुनावणीनंतरच कळू शकते, असे उज्वल निकम म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? शिंदेगट की ठाकरे गट? उज्वल निकम म्हणाले..
न्यायालयीन लढाईसंदर्भात उज्वल निकम यांनी शिंदेंना दिला मोलाचा सल्ला; तो धोकाही सांगीतला
‘ही’ व्यक्ती ठरवणार कोणती शिवसेना खरी अन् कोणती खोटी; उज्वल निकमांची महत्वपुर्ण माहिती
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..