Share

Shivsena : धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? शिंदेगट की ठाकरे गट? उज्वल निकम म्हणाले..

Ujjwal Nikam

Shivsena : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होईल, तर ६ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये ही लढत रंगणार आहे

मात्र, शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने खरी शिवसेना कोणाची हा वाद आहे. याशिवाय शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कोणत्या गटाला जाणार याचाही वाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे आज याबाबतचा निकाल लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिंदे गटाकडून आणखी एक दावा करण्यात आला आहे.

ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबतची सुनावणी घेण्याची मागणीही शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, जर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाकडून पुरावे सादर करण्यात आले असल्याची खात्री झाली असेल, तर निवडणूक आयोग आज याबाबतचा निकाल देऊ शकते. अन्यथा, जर अजूनही पुरावे सादर करायला वेळ लागत असेल तर मग निवडणूक आयोगाकडे चिन्ह गोठवणे हा एकच पर्याय उरतो, असे ते म्हणाले आहेत.

तसेच पुढे ते म्हणाले की, निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करत असते. एक म्हणजे इलेक्टिव विंग म्हणजेच लेजिस्लेटिव्ह आणि दुसरी म्हणजे ऑर्गनायझेशन विंग. इलेक्टिव्ह विंग संदर्भात आमदार आणि खासदार कोणाच्या बाजूने आहेत आणि ऑर्गनायझेशन विंग यासंदर्भात राजकीय पक्षांची जी ऑर्गनायझेशन असते त्याचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत यासंदर्भातला पुरावा द्यावा लागतो.

अर्थात यासंदर्भात कोणाचं बळ किती आहे हे निवडणूक आयोग तपासून बघेल आणि त्यांनतर याबाबत निर्णय घेईल, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जवळ येत असल्याने आज धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या
Tukaram Munde : रात्री रूग्णालयात हजर न राहणाऱ्या डाॅक्टरांना निलंबीत करणार; तुकाराम मुंडेंचा धडाका सुरू
shivsena : ३५ वर्ष घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले की घराला सोन्याचे पत्रे लावण्याएवढा मलिदा खाल्ला?; शिवसेना नेत्याचा शिंदे गटावर घणाघात
Amit Shah : ‘या’ दोन बड्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; दसरा मेळाव्यानंतर राजकीय हालचालींना वेग
Prakash Ambedkar : “बाळासाहेब ठाकरेंमध्ये असलेला दिलदारपणा नरेंद्र मोदींमध्ये नाही”

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now