यूजीसीला विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी नाही का?; युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाईंचा सवाल

 

मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू वरून सरदेसाई यांनी यूजीसीने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला आहे. यूजीसीला विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी नाही का? असा प्रश्न त्यांनी यूजीसीला विचारला आहे.

राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.पण यूजीसीने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परीक्षा घेण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.

दरम्यान वरुण सरदेसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये देश जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.यूजीसी ला विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी नाही का?असा प्रश्न विचारून यूजीसीच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

यूजीसीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व विद्यापीठांना आता परीक्षा घेणे बंधनकारक आहे. राज्य सरकार कडून सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र आता यूजीसीच्या निर्णयावर सरकारची भूमिका काय असणार आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.