Share

‘मी सीटबेल्ट लावले आणि गाडी दाणकन खांबावर घातली’, उदयनराजेंचा किस्सा ऐकून प्रेक्षकही अवाक

Udyanraje.

नुकताच खासदार उदयनराजे भोसले(Udyanraje Bhosale) यांचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या'(Chala Hava Yeu Dya) हा कार्यक्रम सातारा(Satara) शहरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी हवेत बाईकवर स्वार होत एन्ट्री घेतली.(udynaraje told about car airbags story)

या कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ मधील डॉ. निलेश साबळेंनी खासदार उदयनराजे यांच्याशी सवांद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी गाडीच्या एअरबॅग विषयीचा एक किस्सा सांगितला. गाडीला अपघात झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग्स ही अद्ययावत प्रणाली कारमध्ये असते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी कारमधील एअरबॅग्स तपासून बघण्याचा निर्णय घेतला. हा किस्सा सांगताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, “मी नुकताच गाडीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स काढला होता. ज्यामध्ये गाडीचा अपघात झाल्यास सगळे पैसे परत मिळतात. सीटबेल्ट लावले. दाणकन गाडी खांबावर घातली. एअरबॅग निघाले. याला चेकिंग म्हणतात.”

हा किस्सा ऐकल्यानंतर कार्यक्रमातील प्रेक्षक हसू लागले. “कृपया याचं अनुकरण कोणीही करू नका”, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले. खासदार उदयनराजे भोसले पुढे कार्यक्रमात मिश्किल टिप्पणी करताना म्हणाले की, “तुमच्या गाड्या माझ्याकडे द्या, मी चेक करतो, तुम्ही काळजी करू नका.”

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेंनी खासदार उदयनराजे यांना पुष्पा चित्रपटातील डायलॉग सादर करण्याची विनंती केली. त्यावेळी खासदार उदयनराजे यांनी अभिनेता अल्लू अर्जुनची पुष्पा चित्रपटातील स्टाईल मारून दाखवली. ‘पुष्पा झुकेगा नहीं साला’ पुष्पा चित्रपटातील हा डायलॉग खासदार उदयनराजेंनी कार्यक्रमात सादर केला.

यानंतर खासदार उदयनराजेंनी कार्यक्रमात ‘हमें तुमसे प्यार कितना’ हे हिंदी चित्रपटातील गाणं देखील गायलं. यावेळी आवाजाबद्दल बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले की, “माझा आवाज तुटका-फुटका आहे. सांभाळून घ्या. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या :-
रोहित शर्मा पारस आहे पारस, त्याच्यापासून लांब राहा नाहीतर.., माजी भारतीय खेळाडूने दिला इशारा
रशिया-युक्रेन युद्धावर आता रामदास आठवलेंनी केली कविता, ऐकून पत्रकारांनाही आवरेना हसू
राजकारण तापलं! राज्यपालांविरोधात कॉंग्रेस आक्रमक; ‘मोदीजी.. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now