Share

उदयनराजेंचा दिलदारपणा! ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटीलला दिली स्वतःच्या खास नंबरची बुलेट

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून ‘महाराष्ट्र केसरी'(Maharshtra Kesari) पृथ्वीराज पाटील याला आज बक्षीस म्हणून बुलेट देण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी हा बक्षीस सोहळा पार पडणार आहे. पैलवान पृथ्वीराज पाटील याने ‘महाराष्ट्र केसरी’ चा किताब पटकावल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज पाटीलला बुलेट बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली होती. (udyanraje gave his special number bullet to Maharshtra Kesari Prithviraj Patil)

उदयनराजे मित्र परिवाराकडून या बक्षीस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा विजेता पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता प्रकाश बनकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच बक्षिसांचे वितरण देखील करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विजेता आणि उपविजेता पैलवानाला बुलेट, मोटरसायकल आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

या सोहळ्यात ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान पृथ्वीराज पाटीलला बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या बुलेटसाठी खास नंबर घेण्यात आला आहे. या बुलेटसाठी MH -09-GB-007 हा खास घेण्यात आला आहे. हा नंबर खासदार उदयनराजे भोसले यांच्याजवळ असलेल्या सर्व वाहनांना आहे. त्यामुळे या बुलेटची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

या बक्षीस सोहळ्यावर ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान पृथ्वीराज पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून माझा सत्कार होणार आहे. हा सत्कार माझ्यासाठी इतर सर्व सत्कारांपेक्षा मोठा आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर जो ७ नंबर आहे. तोच मला बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या बुलेटला देखील देण्यात आला आहे. ”

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्र लिहून बुलेटसाठी हा नंबर मागितला आहे. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे”, असे ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान पृथ्वीराज पाटीलने सांगितले आहे. यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा साताऱ्यामध्ये झाली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात तगडी लढत झाली होती.

या लढतीत पृथ्वीराजने विशालला ५-४ ने मात दिली होती. विशेष बाब म्हणजे जवळपास २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली होती. पृथ्वीराज हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे गावचा आहे. त्याचे वजन ९५ किलो आहे. त्याने वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. पृथ्वीराजने कुस्तीचा श्रीगणेशा मोतीबाग तालमीतून केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: अखेर क्षमानं स्वत:शीच केलं लग्न, पंडिताने दिला नकार मग ‘अशा’ पार पाडल्या सगळ्या विधी
अमीषा पटेलने ‘या’ सेलिब्रीटींना ओढलं होतं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात, एकजण तर होता विवाहीत
भाजपकडून फोडाफोडीला सुरवात; तीन बडे नेते शिवसेना आमदार ठेवलेल्या ट्रायडंटमध्ये घुसले

 

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now