पुरुषांसाठी वरदान आहे उडीद डाळ; एनर्जी बुस्ट, रक्तभिसरण सारख्या समस्यांवर रामबाण उपाय

आजकाल धावपळीच्या जीवनात अनेक लोक कडधान्य, पालेभाज्या आणि विविध पौष्टिक डाळींचा कमी वापर करतात. त्यांच्या या बदलत्या जीवनशैलीत फास्ट फूडचा जास्त वापर केला जातो. पर्यायाने हे पौष्टिक अन्न कमी खाल्ले जाते. त्याचा त्यांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.

सर्वच प्रकारच्या डाळी शरीरासाठी फायदेशीर असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीमधून वेगवेगळे जीवनसत्व मिळत असतात. त्यामुळे सर्व प्रकारचे कडधान्य आणि डाळींचे सेवन केले पाहिजे. आज आपण अश्याच एका आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या डाळीविषयी माहिती घेणार आहोत, ती डाळम्हणजे उडीदडाळ.

अनेक पुरुषांसाठी उडीद डाळ वरदानापेक्षा कमी नाही. उडीद या कडधान्य बियांपासून उडीद डाळ तयार केली जाते. ही डाळ भारतीय स्वयंपाक घरातील एक प्रमुख पदार्थ आहे. उडदाचे उत्पन्न संपूर्ण भारतभर घेतले जाते. या डाळीमध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात.एक काळी डाळ आणि दुसरी पांढरी डाळ. या डाळीचा उपयोग वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी गेला जातो, जसे की आमटी, वडे, पापड  इडल्यामध्येही ही डाळ वापरली जाते.

उडीद डाळीत व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते तर कोलेस्ट्रॉल अगदी कमी मात्रामध्ये असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच उडीद डाळीत औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे डॉक्टरही उडीद डाळ जेवणात वापरण्याचा सल्ला देतात. पाहू या उडीद डाळीचे फायदे…

१ रक्तप्रवाह- उडीद डाळ आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी कार्य करते. उडीद डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात, जे आपल्या शरीरातील रक्ताचे कार्य सुधारित करण्यासाठी तसेच पाचक प्रणालीला उर्जा देण्याचे कार्य करते.

२ डोकेदुखी- धावपळीच्या जीवनात ताणतणावामुळे सतत डोकेदुखी त्रास जाणवत असतो. या साठी घरघुती उपाय म्हणून आपण उडीद डाळीचा उपयोग करू शकतो. ५० ग्राम उडीद डाळ १०० मल दुधात भिजत घालावी, नंतर ती शिजवून त्यात गाईचे तूप टाकून खावी. डोकेदुखी गायब होते.

३ हाडांसाठी फायदा- हाडांना मजबूत बनण्यासाठी उडीदडाळीचे सेवन करणे आवश्यक आहे. उडीद डाळ मध्ये मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे महत्वपूर्ण खनिजे असल्यामुळे ते बोन मिनरल डेन्सिटी मजबूत बनण्यासाठी महत्वाचे काम करते.

४ केसांना फायदा- उडीद डाळ तव्यावर जाळून त्याची पावडर करावी नंतर त्यात दूध किवा मोहरीचे तेल घालून डोक्याला मालिश करावी त्यामुळे केसांचे गळणे कानी होते. केस पांढरे होत नाही आणि स्काल्प सबंधीचे रोग होत नाही.

५ त्वचा-  उडदाची डाळ रात्री दुधात भिजवून ठेवून सकाळी बारीक करावी. यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध टाकून हा लेप चेहऱ्यावर लावावा. एक तासानंतर चेहरा धुवावा. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास चेहऱ्यावर चमक येते.

६ घोळणा- बऱ्याच लोकांच्या थंडीत किवा उन्हाळ्यात नाकातून रक्त येते अश्या वेळी उडदाच्या पिठाचा लेप बनवून टाळूवर लावावा लगेच फरक पडेल. नाकातून रक्त येणे बंद होईल.

७  पुरुषांमधील यौन शक्तीसाठी- पुरुषांमधील कमजोरी दूर करण्यासाठी आणि यौन शक्ती कायम ठेवण्यासाठी उडीद रामबाण उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी उडदाच्या डाळीच्या पाण्याचे सेवन करावे.

८ हृदयासाठी- उडीद डाळ मध्ये फायबर सारखी घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर शरीरामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करून हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो हृदयासंबंधी असलेल्या समस्या कमी होतात.

९ पचन- उडीद डाळींमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. जर तुम्हाला लूज मोशन, कब्ज सारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये उडीद डाळीचा समावेश करणे आवश्यक आहे.

१० गर्भवती महिला- ज्या महिला गर्भवती आहेत त्यांच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता निर्माण होते. उडीद डाळ आयर्नची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. तसेच शरीरामधील एनर्जी पातळीला वाढवून अधिक ऍक्टिव्ह बनवण्यास  मदत करते. उडीदडाळीचा एखादा पदार्थ बनवून खा. ४/५ तास भिजत खालून नंतर फ्राय करून खा.

हे ही वाचा-

VIDEO: पोलिसांसमोर तरुणीचा भररस्त्यात ड्रामा; मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनाही सुनावले खडे बोल

रत्नागिरीत कोरोना पाॅझीटीव्हने केले लग्न; प्रशासनाने दिला ५० हजार रूपये दंडाचा दणका

विवाहीत टेनिस खेळाडू महेश भुपत्तीवर फिदा झाली होती लारा दत्ता; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.