उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांशी साधला संवाद; कोरोना लढ्यात डॉक्टरांचे महत्व केले अधोरेखित

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात पण धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढताना मृत्यूची संख्या पण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना नियंत्रणात यावा म्हणून महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे.

अशा निर्णयामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला आहे. सर्वसामान्य माणसांच्या मनात कोरोनाची भीती मोठ्या प्रमाणावर आहे.

कोविडची लढाई भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत सर्वानी सोबत येऊन काम करण्यासाठी मी साद घालत आहे. असे उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना उद्देशून म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी डॉक्टरांना भावनिक साद घातली आहे.

कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माझा डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख आहे त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. चला, सर्वांच्या सहकार्यातून आपण करोना विषाणुचा नायनाट करूया असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवतात. डॉक्टरांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचारांचे योग्य वेळी शिवधनुष्य उचलावे असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना केले आहे.

यावेळी पुढे बोलताना ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोविड झाल्यानंतर रुग्णाचे शरीर साखरेचे पोते होऊ नये. ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे त्यांनी तो नियंत्रणात ठेवावा. इतर असणाऱ्या रोगांवर पण नियंत्रण ठेवावे. घरच्या घरी आपण जबाबदारी घेऊन डॉक्टरांना साथ द्यायला हवी असे आवाहन पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या
‘ह्या’ डाॅक्टरचा अजब दावा! म्हणतोय कोरोनावर दारू आहे गुणकारी; वाचा त्याचं नेमकं म्हणणं काय..

आज राज्यातील ‘या’ भागात धडकणार ताऊते चक्रीवादळ; हवामान खात्याने सांगीतले ‘असा’ करा बचाव

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळाचा हाहाकार; कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.