फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई | ‘प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

आज त्यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी दिवाळीत फटाकेबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. फटाकेबंदीबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘फटाक्यांवर बंदी आणता येईल, परंतु स्वत:हुन आपण बंधन घालून घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्ही बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो.’

फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. डॉक्टर्स, अन्य यंत्रणा यांच्यावर खूप ताण आहे. हे ते कुणासाठी करत आहेत? तुमच्यासाठीच ना? आपली आजवरची मेहनत प्रदुषणामुळे व्यर्थ जायला नको, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, फटाक्यांवर बंदी घालायची का? ती जरुर घालता येईल पण ती मुळीच घालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत जसं सहकार्य केले तसेच दिवाळीलाही करा, असे ते म्हणाले. ‘दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. दिवाळीचा सण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा,’ असे ते म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या
मंदिर आणि प्रार्थनास्थळं कधी उघडणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत
आणीबाणी लादणार नाही! फटाक्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.