अर्णबच्या वकिलांचा सवाल; ‘…मग मुख्यमंत्र्यांनाही अटक करणार का?’

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी सुरु आहे.

तसेच अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडत आहेत. न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना साळवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘जर महाराष्ट्रात राज्य सरकारचे नाव लिहून किंवा त्यांना दोष देत जर कोणी आत्महत्या केली तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का,’ असा सवाल केला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर, आम्ही न्यायालय म्हणून त्यांच्या मदतीसाठी आहोत, हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे.’

 

महत्त्वाच्या बातम्या
अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबांतील संबंधाबाबत भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
अन्वय नाईकांनी आईची ह.त्या करुन नंतर आत्मह.त्या केली अर्णबच्या वकीलांचा धक्कादायक युक्तीवाद
रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.