Share

उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘बुडाखाली संपूर्ण देश…’

Uddhav-Thakre-Devendra-Fadanvis.

एमआयएम(MIM) पक्षाने महाविकास आघाडी सोबत युती करण्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे, असा टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेला लगावला होता.(uddhv thakre statement on bjp )

यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे’, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. ‘भाजपाचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. आम्ही भाजपाला सोडलं आहे. हिंदुत्वाला नाही. सत्ता असो किंवा नसो आम्ही हिंदुत्वाला सोडणार नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “विरोधकांचं धोरण ओळखा. भाजपकडे आपण काय केलं हे सांगण्यासारखं नाही. म्हणून आपल्यावर टीका करत आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी दैदिप्यमान विजय मिळवला असं काही नाही. समाजवादी पक्षाच्या जागा देखील वाढल्या आहेत. एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि संमोहन करत आहेत. वस्तुस्थितीचा विचार करणार नाही अशा पद्धतीची भीती दाखवत आहेत.”

भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “पूर्वी इस्लाम खतरे मे है म्हणायचे, आत हिंदू खतरे मे है अशी नवी बांग त्यांची सुरु आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची. इतिहासाच्या खपल्या काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या युतीसंदर्भात दिलेल्या ऑफरवर देखील भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतीत म्हणाले की, “अफजल गुरूला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएम पक्षासोबत जाणार नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
आळंदीच्या तरूणाला हायटेन्शन टॉवरवर चढलेलं पाहून पोलिसांना आले टेन्शन, तब्बल ९ तास चालली नौटंकी
”काश्मिर फाईल्सच्या इंटरव्हलनंतर माणूस झोपी जातो, गुजरात फाईल्सवर चित्रपट काढला पाहिजे”
..त्यामुळे मावळची जागा ही पार्थ पवारांना देण्यात यावी, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now