अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई | सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी स्वतः नुकसानग्रस्त भागाची जाऊन पाहणी केली. या एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये त्यांनी अक्कलकोटच्या गावांतील नुकसानीची पाहणी केली. तसेत शेतकऱ्यांना धीर दिला.

मात्र शेतकऱ्यांचा राग आनावर झाला असून मुख्यमंत्र्यांनी थेट बांधावर जाऊन शेतीचं झालेलं नुकसान पाहावे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईसाठी काहीतरी योजना आखावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये पाहणी केली.

त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहीजे. केंद्र सरकारची वाट न पाहता आधी राज्य सरकारने मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

फडणवीसांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अतिवृष्टी होऊ नये अशी प्रार्थना करत आहे. पंचनामे सुरू आहेत. माहिती घेत आहे. माहितीच अभ्यास करत बसणार नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्याची थकीत येणी जर केंद्र सरकारकडून आली तर मदतीसाठी हात पसरावे लागणार नाहीत.

केंद्राने विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात दुजाभाव करू नये असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी शेतकऱ्यांना असे आश्वासनही दिले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी नाराज होऊन जीवाचे काही बरे वाईट करून घेऊ नये.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.