फडणवीसांनी बिहारच्या ऐवजी दिल्लीला जावं, पंतप्रधान घराबाहेर पडतील- उद्धव ठाकरे

मुंबई | गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत असा पाऊस या महिन्यात कधीच झाला नव्हता. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांना या पावसाचा खुप मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. कोरोनामध्ये आधीच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले होते आणि आता लॉकडाऊनमध्ये जे पिकवलं ते पण पावसाने उध्वस्त केले. आता परत उभं कसं राहायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अनेक मंत्री आज दौऱ्यावर गेले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुध्दा आज राज्यातील विविध भागात दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी आज सोलापूरमध्ये पाहणी केली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहीजे. केंद्र सरकारची वाट न पाहता आधी राज्य सरकारने मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याचदरम्यान उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पूढील कामकाजाचा आढावा सांगितला.

कामाचा आढावा सांगत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युतर दिले. ते म्हणाले की, फडणवीस बिहारला जातात, त्याएवजी त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील. असा टोला त्यांनी लगावला.

केंद्र सरकार परदेशातील सरकार नाही, ते देशाचं सरकार आहे. त्यामुळे विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. केंद्र सरकार हे देशातील सरकार आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.