फिल्मी आणि खऱ्या पोलिसांमध्ये जमिन आस्मानचा फरक असतो- उद्धव ठाकरे

मंगळवारी नाशिकच्या पोलिस प्रबोधनातील ११८ व्या दीक्षांत सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना सल्ला दिला. ते म्हणाले की, चित्रपटातील पोलिसांमध्ये आणि खऱ्या पोलिसांमध्ये जमिन आस्मानाचा फरक असतो.

प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी प्रशिक्षणाबरोबर प्रसंगावधान बाळगणेही गरजेचे आहे, असे त्यांनी नवीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.

यावेळी त्यांनी पोलिस उप निरिक्षक पदाचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. पुढे ते म्हणाले की, तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून तुम्ही सदृढ शरीर कमावलेच आहे पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक आहे.

कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भुमिका बजवाव्या लागतात. तसेच त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, प्रशिक्षणार्थिंनी स्वाताहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधंसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे.

स्वताहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थिंना मानाचा मुजरा करावाच लागेल. कोरोनासारखी रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे. गुन्हेगारी क्षेत्राचे हे आव्हान आता ऑनलाईन आणि त्या स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढू लागले आहे.

तरीही त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रत्यक्ष त्यांना बेड्या घालाव्या लागणार आहेत. खडतर प्रशिक्षण पुर्ण करताना जल्लोष होणारच पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश याचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल.

तुमचे कुटुंबीय आधीरतेने तुमची वाट पाहत आहेत. पण आता संपुर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. तुमचे स्वप्न आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे. तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे.

लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल असा विश्वासही मला आहे. महाराष्ट्राच्या परिवारात तुमचे स्वागत, असे उद्धव ठाकरे संबोधित करताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
आता कशी आहे तब्येत? मोदींचा थेट शरद पवारांना फोन, शरद पवारांनीही मानले आभार
#Lockdown : लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…
नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याने राजकीय चर्चांना उधाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.