शिवसेनेचा वाघ विरोधकांवर गरजला, तुम्ही एक सूड काढाल आम्ही १० सूड काढू, पहा व्हीडिओ

मुंबई | महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून घेण्यात आली आहे.

तर यामध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. पण त्यांनी नाव नाही घेतले. या मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की हात धुवा असे सांगण्यापलीकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलंय? याचे उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अगदी नकळत भाजपवर निशाणा साधला आहे.

हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत आहे.

यामध्ये त्यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे पण कोणाचेही नाव घेतले नाहीये. तसेच ते म्हणाले आहेत की, आव्हान दिल्यानंतर मला जास्त स्फूर्ती येते. हे सरकार पडेल अशी अनेक भाकीतं वर्तवण्यात आली आणि असं बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत.

सुडानं वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढाल तर आम्ही १० सूड काढू असा इशाराही त्यांनी या मुलाखतीतून दिला आहे. ही मुलाखत उद्या रिलीज होणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नांवर काय काय उत्तरे दिली? हे पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.