धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा

भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधामामुळे शिवसेना नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. असे असताना आता मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतूक केलं की भिती वाटते. तो डायलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहे. यापुढेही देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वरळी येथील बीबीडी चाळ पुनर्वसन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाला शरद पवार प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला होता.

सतेज पाटीलजी डबल सीट म्हणाले पण आपले सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतूक केलं की भिती वाटते, तो डायलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच जेवढ्या खाल्ल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहे. यापुढेही देऊ, त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा लढवय्या गुण आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संजय राऊंतानी काढली 3 शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत
“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”; प्रसाद लाड यांच्या विधानानंतर वातावरण तापलं
देशातील हर चौथा मुसलमान भिकारी आहे – संजय राऊत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.