मुंबई | भंडारा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगदळे यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांना भेटलो. त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कारण जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केलं तरीही ते परत आणता येणार नाहीत. ‘त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिल्या खेरीस माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते’ अशी भावुक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, ‘राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर एन्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, असंही ते म्हणाले. या घटनेवरुन थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेची रणरागिणी कडाडली, म्हणाली…
माझीही सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा थेट गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन
फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा गंभीर आरोप, ‘हे कोत्या मनोवृत्तीचे राजकारण’