शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नाराजीमुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे सांगितले जात आहे.(Uddhav Thackeray’s support for Eknath Shinde’s revolt)
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची स्क्रिप्ट लिहिली का? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला संमती असल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे यांची संमती नसती तर इतक्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला नसता, अशी चर्चा सध्या होतं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांनी भाजपविरोधात वक्तव्ये केली आहेत. भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी याच आमदारांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही ठरवून केलेली खेळी दिसत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होतं आहे. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अनेक वेळा तक्रार केली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून आपल्याला योग्य निधी दिला जात नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे शिवसेनेचे आमदार नाराज होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली असती. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची स्क्रिप्ट लिहिली, अशी चर्चा सध्या होत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या बंडखोरीशी काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठीमागून वार करत नाहीत”, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या :-
या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं, हे बंडखोर नाहीत बदमाश आहेत- संजय राऊत
उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची स्क्रिप्ट लिहिलीय; ‘या’ गोष्टींवरून तेच सिद्ध होतय
…तरच सरकार स्थापण करू; भाजपने एकनाथ शिंदेंना घातली ‘ही’ अट; शिंदेंना धक्का