Udhhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे आता शिवसेनेच्या भविष्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्याही एकमेकांवरील टीका सतत सुरूच आहेत. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील अग्रलेखातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे या लेखातून म्हणाले की, “शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिंदे गटाचे मुख्यमंत्रिपद हा साबणाचा बुडबुडा आहे. महाराष्ट्रात चीड आहे, संताप आहे. आम्ही शिवसेनेच्या उपनेत्यांना महाराष्ट्रात पाठवलं आहे. आदित्य चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे.”
“लवकरच आम्ही स्वतः महाराष्ट्र पिंजून नव्हे तर घुसळून काढणार आहोत. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊच, पण शिवसेना फोडणाऱ्यांनाही याच जमिनीत गाडून दाखवू,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी या अग्रलेखातून दिला आहे.
शिवसेनेवर आपला दावा सांगणाऱ्यांसोबतच उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न!”
तसेच, घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी या अग्रलेखातून केले आहे. शिवसेना म्हणजे सह्याद्रीच्या उंच कडेकपारीच आहेत, असेही त्यांनी या अग्रलेखातून म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यात आणखी नव्या वादाला तोंड फुटेल का? हा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
Pushpa 2: ‘पुष्पा २’ बाबत समोर आली मोठी अपडेट, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, चाहते उत्सुक
Uddhav Thackeray : विरोधकांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, मविआच्या बैठकीत झाला मोठा निर्णय
Lal Singh Chadha: देशात फ्लॉप झाला पण तरीही मोठ्या चित्रपटांचा ‘लाल सिंग चड्ढा’ने केला पराभव, केली ‘एवढी’ कमाई
Bihar : बिहारमध्येही ईडीचे छापेमारीचे सत्र सुरू, फ्लोअर टेस्टच्या आधीच ‘या’ बड्या नेत्यांवर कारवाई