Share

Uddhav Thackeray : स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला आणि आता त्यांनाच तुम्ही…आत्तेबहीणीचा शिंदेंवर गंभीर आरोप

Eknath Shinde Jaydev Thackeray

Uddhav Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर बुधवारी पार पडला. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांवर प्रचंड टोलेबाजी केली. तसेच यावेळी बघायला मिळालेली एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या स्टेजवर उद्धव ठाकरेंचे मोठे भाऊ आणि वहिनी उपस्थित होते.

बीकेसी येथील मैदानावर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांच्या स्टेजवर उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे हे दोघेही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

या सगळ्या प्रकारावर उद्धव ठाकरेंच्या आत्येबहीण कीर्ती फाटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्याबद्दल बोलताना कीर्ती फाटक म्हणाल्या की, मला हे चित्र खूप दुर्दैवी वाटत आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकालाच त्याचा त्रास होत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

ठाकरेंच्या घरातील अर्धे लोक आमच्या गटात आहेत असे दाखवण्याचा शिंदे गटाचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. तसेच त्यांनी त्यांच्या दसरा मेळाव्याला जे ठाकरे बोलवले होते, त्यांच्याबद्दल मला भरपूर आक्षेप आहेत, असेही त्या म्हणाल्या. २००९ मध्ये स्मिता ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला होता. त्यांनी तशा उघड प्रतिक्रियाही मीडियाला दिल्या होत्या.

तेव्हा त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे खूप गोडवे गायले होते. काँग्रेसचीच आयडिओलॉजी कशी छान आहे, मला पटत आहे आणि तीच कशी देश पुढे नेऊ शकते अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या. आता त्यांच्या त्या गप्पा कुठे गेल्या? शिंदेंनी त्यांना याच्याबद्दल कधी काही विचारलं आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख हयात असताना जी व्यक्ती काँग्रेसचे गोडवे गात होती त्या व्यक्तीचा तुम्ही स्टेजवर बोलवून सन्मान करत आहात हा तुमचा दुटप्पीपणा आहे. हा दुटप्पीपणा सगळे मराठी लोक बघत आहेत, महाराष्ट्रातील जनता बघत आहे आणि ते मतपेटीमध्ये नक्की त्याचं उत्तर देतील असे मला वाटते, असेही कीर्ती फाटक म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जयदेव ठाकरे हे आमचे मोठे बंधू आहेत. आम्ही नेहमी त्यांचा आदरच करत आलो आहोत. त्यांच्यामध्ये कलागुण आहेत आणि ते खूप टॅलेंटेड व्यक्ती आहेत. मला एक कळत नाही की, काही वर्षांपूर्वी याच जयदेव ठाकरेंनी आपल्या वडिलांबद्दल मीडियासमोर अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत हे शिंदेंना माहिती नाही का? बहुतेक ते हे विसरले आहेत, असे त्या म्हणाल्या.

ज्या बाळासाहेबांना ते दैवतासमान मानत आहेत, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत अशा वल्गना करत आहेत. ज्या व्यक्तींनी बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली होती त्यांचा तुम्ही सत्कार करत आहात, याचा अर्थ काय? ही तुमची बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा आणि भक्ती आहे का? की तुम्ही ही नुसती नौटंकी चालवली आहे?, असा टोला कीर्ती फाटक यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या
Amol Mitkari : “धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरेंचाच अधिकार होता, आहे आणि राहणार”; राज्यातील बड्या नेत्याने सांगीतले कारण
Uddhav Thackeray: दसऱ्याच्या पावर शो मध्ये एकनाथ शिंदे पडले उद्धव ठाकरेंवर भारी, वाचा नेमकं काय घडलं?
Ambadas Danve : शिंदे फडणवीस सरकारचा पहीला भ्रष्टाचार आला समोर; ५१३ कोटींच्या दिवाळी फूड किटबाबत गंभीर आरोप
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी दसऱ्याला केली खरी सत्तापालट, उद्धव ठाकरेंच्या छातीत बाणासारखा टोचणार ‘हा’ वार

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now