Share

Uddhav Thackeray : सरकारला सळो की पळो करा; दिल्लीतील बैठकीत उद्धव ठाकरे यांचा खासदारांना थेट आदेश

Uddhav Thackeray :  शिवसेना (ठाकरे गट)चे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) आपल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकार (Modi Government)वर जोरदार टीका करत, “सरकारला सळो की पळो करून सोडा,” असा ठाम आदेश दिला.

6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे दिल्लीला दाखल झाले. 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडिया आघाडी (India Alliance)च्या बैठकीआधी ही बैठक घेतली गेली. बैठकीसाठी त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सफदरजंग लेन येथील निवासस्थानी खासदारांना पाचारण केलं होतं. या वेळी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “शिवसेना (Shiv Sena) ही जनहितासाठी लढणारी ताकद आहे. सत्तेसाठी काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा नाही. जनतेच्या प्रश्नांवर संसदेत आवाज बुलंद करा.”

या बैठकीत उपस्थित खासदारांमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अरविंद सावंत (Arvind Sawant), अनिल देसाई, बंडू जाधव, राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze), भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil), संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश होता.

उद्धव ठाकरे यांनी केवळ केंद्र सरकारवर टीका केली नाही, तर आपल्या खासदारांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. पक्षाच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं समजतं. आगामी निवडणुका, विशेषतः महापालिका (Municipal Corporations) आणि स्थानिक स्वराज्य संस्था (Local Bodies) निवडणुकांमध्ये आघाडीची भूमिका ठरवण्यासाठी ही चर्चा निर्णायक ठरू शकते. सर्व विरोधी पक्ष सध्या एकत्र येत असून, बैठकीत कोणते मुद्दे अग्रक्रमावर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now