‘ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा’; उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला(Shivsena) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Uddhav Thackeray’s challenge to the rebels)

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या सर्व प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘हे सर्व भाजपनेच केलं आहे. या आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेलं”, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. त्या बंडाला भाजप जबाबदार आहे. भाजपनेच एकनाथ शिंदे यांना फुस लावली आहे. हे सर्व भाजपनेच केलं आहे. या आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेलं”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याजवळची दोन खाती मी एकनाथ शिंदे यांना दिली. यापूर्वी नगरविकास खातं मुख्यमंत्री स्वतःजवळ ठेवत होते. पण मी ते खातं एकनाथ शिंदेंना दिलं. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात. आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि आम्ही बडवे होते.”

“आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे. एकनाथ शिंदे यांचा मुलगा शिवसेनेकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीवर नाराजी देखील दर्शविली आहे.

“कितीही आमदार घेऊन जा. शिवसेनेला काहीही होणार नाही. ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा”, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ‘यापूर्वी देखील असे बंड झाले आहे. या संकटातून शिवसेना पुन्हा उभी राहील’, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मी सलमानचा विरोध केला तर माझे मॉर्फ केलेले फोटो पॉर्न साईटवर टाकले होते, गायिकेच्या वक्तव्याने खळबळ
हे भाजपचेच कटकारस्थान, आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल’; ठाकरेंनी ठणकावले
क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल, आता पुरूष आणि महिला एकत्र भिडणार, वाचा कसा असेल फॉरमॅट