…तर पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई |  गेल्या वर्षभरापासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवून हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येत असतानाचं कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्मंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

जनतेशी संवाद साधताना मुख्मंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक महत्वाच्या मुद्दयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊन जाहीर करणार का? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. परंतू लॉकडाऊनबाबत येत्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादूर्भाव पाहून निर्णय घेणार असल्याचं सांगितले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कोरोना विरोधातील लढाई लढतो आहे. नागरिकांना घरामध्ये बंद करून ठेवणं कुणालाही आवडणार नाही. तसेच कोरोना देशात येऊन एक वर्ष झाले आहे. मास्क हिच आपली कोरोनाविरोधात लढण्यासाठीची ढाल आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ याठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात ‘मी जबाबदार’ ही मोहिम राबवण्यात येणार आहे. जनतेसाठी कोरोना लसीकरण लवकरचं सूरू करण्यात येणार आहे. राज्यात आज ७००० नवे रूग्ण सापडले आहेत. राज्यात लॉकडाऊन करायचा कि नाही जनतेच्या हातात आहे. कोरोनाचे नियम तुम्ही पाळता का नाही हे पाहून लॉकडाऊन बाबत येत्या ८ दिवसात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच माहीत होतं; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील एका आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर
ब्रेकिंग न्युज! पुण्यात उद्यापासून पुन्हा कडक निर्बंध, वाचा काय सुरू आणि काय बंद राहणार
करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.