महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. बंडखोर आमदारांना ठाकरे यांनी २४ तासांची मुदत दिली आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. असे सांगितले जात आहे कि, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेत स्पष्टपणे सांगितले होते कि बंडखोर आमदार २४ तासात परत आले तर ठीक अन्यथा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही.(Rebels, Chief Minister, Uddhav Thackeray, Ultimatum, Guwahati, MLA)
काल झालेल्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले निर्धारित वेळेत बंडखोर माघारी न आल्यास हा लढा आरपारचा असेल. यावेळी ते म्हणाले की आम्ही हार मानणार नाही. त्यांनी सर्व शाखाप्रमुखांना आपापल्या भागात बैठका घेण्यास सांगितले आहे.
याआधी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्याची इच्छा असेल तर ते राजीनामा देऊ शकतात आणि पक्षाचे पद सोडण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यासाठी नेत्यांना समोर येऊन हे सांगावे लागेल. राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
शिवसेना मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला पक्षाचे सर्व बडे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेतून बंडखोरांना मोठा संदेश दिला जाऊ शकतो. शिवसेनेचे सर्व आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत.
सर्व बंडखोर गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. आपल्यासोबत ५० हून अधिक आमदार असल्याचा शिंदेंचा दावा आहे. ज्यामध्ये सुमारे ४० आमदार शिवसेनेचे आहेत. यासोबतच १२ अपक्ष आमदारही उपस्थित आहेत. शिंदे यांच्या दाव्यानंतर सरकार पडणे जवळपास निश्चित झाले असले तरी शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण पक्ष आपल्या पाठीशी उभा असल्याचा दावाही शिंदे करत आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे हे संकट कसे दूर करतात हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
राहुल जैन नाव सांगू २ वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिला अब्दुल वसीम, लग्नाचं वचन देऊन केला बलात्कार
हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राजसाहेबांच जून भाषण व्हायरल
“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले आता कसं वाटतंय?”