Share

Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात येत असतो. मात्र, आता एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे हे दोन्ही गट वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमनेसामने येत असतात.

शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवतीर्थावरची दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. परंतु, यावर्षी हा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी कोणाचा होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

दरम्यान, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी या दोन्ही गटांकडून महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, महानगरपालिकेने अद्याप यावर कुठलाच निर्णय दिलेला नाही. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याची पाहायला मिळते.

शिवसेनेच्या नेत्यांकडून दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेना सरळ कोर्टाची पायरी चढणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच हे प्रकरण आणखी ताणल्यास थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची कल्पना वापरणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. बाळासाहेबांनी टॅक्सीवर उभे राहून भाषण केले होते. त्यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरेदेखील थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

दसरा मेळाव्यावर सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यावर वक्तव्य केले आहे. महानगरपालिकेला आम्हाला परवानगी द्यावीच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेना लवकरच महापालिकेकडे जाऊन चौकशी करणार असल्याचीही महिती समोर आली आहे. दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय का लांबवला जात आहे हे विचारण्यासाठी शिवसेना महानगपालिकेच्या कार्यालयात जाणार आहे. तसेच एमएमआरडीएने शिंदे गटाला बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.

मात्र, आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी कोणाला मिळते?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर काय निर्णय लागतो हे पाहणे महत्वाचे ठरते.

महत्वाच्या बातम्या
Shreya Bugde : ..तेव्हा उषा नाडकर्णींचा फोन येताच श्रेया बुगडेलाही फुटला होता घाम, म्हणाली, ‘हवं तर मला मार’
Narayan Rane : अधीश बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार ; नारायण राणेंना कोर्टाचा दणका
raju srivastav : राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड! वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Eknath shinde : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच सभास्थळातून लोकांनी घेतला काढता पाय, घटनेचा VIDEO तुफान व्हायरल

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now