Share

Uddhav Thackeray : लढा अजून संपलेला नाही! उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, आमदारकीचा राजीनामा घेतला मागे

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे शिवसेनेशी बंडखोरी करत ४० आमदार आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी मिळून आपले सरकार स्थापन केले.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतेवेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचीही घोषणा केली होती. मात्र, आता त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. आता ते आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या बदलेल्या निर्णयामुळे ते पुन्हा परत येणार का?, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला असल्याचेही बोलण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांना आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी विधानपरिषद किंवा विधानसभा सदस्यत्व मिळवणे अनिवार्य होते. त्यामुळे त्यांनी विधानपरिषदेचे सदस्यत्व स्वीकारले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. परंतु, आता त्यांनी त्यांचा हा निर्णय बदलला आहे. ते आता आपली आमदारकी कायम ठेवणार असून विधान परिषदेतून सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करता आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा सर्व्हे रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
Nawab Malik : नवाब मलिकांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्वाची अपडेट, रुग्णालयातील मुक्काम वाढला
Rakesh Jhunjhunwala Died : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे अचानक निधन
मेटेंना अपघातानंतर १ तास मदतच मिळाली नाही, अखेर रस्त्यावर झोपून गाडी थांबवली; ड्रायव्हरने सांगीतला थरार
vinayak mete died : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन; महाराष्ट्रावर शोककळा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now