एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.(Uddhav Thackeray will make a strong comeback? ‘This’ is a big decision)
यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गट जोरदार तयारी करत आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात सामील असणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पक्षबांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.
पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे पाच मुद्द्यांकडे सर्वात जास्त लक्ष देत आहेत. पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा देखील करणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. शिवसेना पक्षातील गळती रोखणे, हे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. सध्या शिवसेना पक्षातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे या रिक्त पदांच्या जागी नवी नेमणूक करणे, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरील एक आव्हान आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांना वठणीवर आणण्याचे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी समर्थकांसह मुंबईत शक्ती प्रदर्शन केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
बंडखोरी केलेल्या आमदारांना वठणीवर आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय
बिल गेट्सला मागे टाकत ‘हा’ भारतीय उद्योगपती बनला जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती
गौतम अदानी बनले जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्सनाही टाकले मागे