Share

Uddhav Thackeray : बाटग्यांच्या शिंदे गटाने घ्यायला दसरा मेळावा म्हणजे काय सुरती बाजारबुणग्यांचा मेळा आहे का?

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेवर आपला दावा सांगत आहेत. तसेच पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हसुद्धा आपलेच असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे शिवसेना नक्की कुणाची, याबाबत सुप्रीम कोर्टात सध्या वाद सुरु आहे.

दरम्यान, दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट पडल्याने यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत दोन्ही गटाकडून आम्हीच दसरा मेळावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तुन दसरा मेळव्याबाबत जोरदार वार करण्यात आला आहे. “दसरा मेळावा हा राजकीय जागर असतो. महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, ‘सुरती’ बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत मराठी – हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर. दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱ्यांच्या ५६ पिढ्या खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही,” अशा शब्दात या अग्रलेखातुन शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

तसेच “सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाड्याची गर्दी जमवून स्वतःचा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात. इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले. न्याय विकत घ्याल, पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार?”, असा सवालही यातून करण्यात आला आहे. पुढे या अग्रलेखात भाजपवरही हल्लाबोल करण्यात आला आहे.

“भारतीय जनता पक्षाला शिवतीर्थावरच मराठी लोकांत दोन तट पडून तेथेच मराठी रक्त सांडावे असे वाटते. ज्या शिवतीर्थावरून संयुक्त महाराष्ट्राच्या विराट विजयी सभेतून एकजुटीचे दर्शन घडले, ज्या शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेची आणि विजयाची ललकारी घुमली, ज्या शिवतीर्थावर मऱ्हाठी एकजुटीच्या लाखो वज्रमुठी आवळल्या त्या वज्रमुठी तुटाव्यात हेच भाजपचे मिशन मुंबई आहे,” असेही यात म्हटले गेले आहे.

महत्वाच्या बातम्या
शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; ठाकरे गटातील आमदाराने गायकवाडांना सुनावले
Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला खलिस्तानी संबोधणाऱ्या पाकीस्तानची घाणेरडी चाल झाली उघड; जगभरातून निषेध
Amit Shah : उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीर खूपसलाय, त्यांना शिक्षा झालीच पाहीजे; अमित शहांचा ठाकरेंवर हल्लाबोल
सावंतांकडून शिवसेनेला भलं मोठं भगदाड; हजारो कार्यकर्ते-पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, थेट उद्धव ठाकरेंना धक्का

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now