गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाचे नाव, उद्धव ठाकरेंनी ताबडतोब केली ‘ही’ कारवाई

गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

झाले असे होते की पाच दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने ही कामगिरी करत लाखो रूपयांचा गुटखा जप्त केला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे सिद्ध झाले होते.

त्यानंतर खांडे आणि आबा मुळे यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.

या घटनेनंतर खांडे जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बिनधास्त फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर या प्रकरणातीच उद्धव ठाकरेंनी दखल घेतली. शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त छापण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कुंडलिक खाडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. कुंडलिख खाडे यांच्यावर बीडच्या केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांडे हे सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोधही घेत होते. मात्र शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या बीड दौऱ्यातील कार्यक्रमात फरार आरोपी कुंडलिक खांडे हे बिनधास्त फिरत होते.

यावर माध्यमांनी अनिल देसाई यांना घेरल्यानंतर त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे लवकरच कुंडलिक खाडे यांच्यावर कारवाई करतील. त्यानुसार खाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कुंडलिक खाडे यांच्यावर याआधीही अनेक आरोप झाले आहेत. गुटखा प्रकरणात नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
पोरांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या NCB अधिकाऱ्यांना तुरूंगात टाका – शिवसेना
पोलीस भरती परीक्षेत कॉफी बहाद्दरांची अनोखी शक्कल, चक्क मास्कमध्येचं बसवले इलेक्ट्रोनिक डिव्हाईस, पाहून पोलीसही हैराण
कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेने मारली बाजी; राणेंचा दारूण पराभव करत केला सुपडा साफ
मोदी सरकार दोन मोठ्या सरकारी कंपन्यांची विक्री करण्याच्या तयारीत, नावे वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.