उद्धव ठाकरेंची ‘ती’ रणनीती ठरली यशस्वी! महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई । सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी एक आंनदाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासात ३ हजार ८७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ९ हजार १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात दिलासादायक असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हा परिणाम दिसून आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत अनेक कठोर निर्णय घेतले होते. याबाबत त्यांनी रणनीती आखून महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

राज्यात उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी, विकेंड लॉकडाऊन, अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता याचा परिणाम आता दिसून येत आहे.

मुंबईध्ये सध्या ७० हजार ७७३ कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 87 टक्क्यांवर आहे. यामुळे अनेक दिवसांपासूनचा हा एक मोठा दिलासा आहे.

तसेच येणाऱ्या काळात रुग्ण वाढीचा दर हा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून कोरोना हद्दपार होईल, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती.

ताज्या बातम्या

…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल

श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्कीटं; परमबीर सिंगाविरोधात अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

VIDEO: कोरोना नियम धाब्यावर; पीपीई कीट घालून रुग्णवाहिका चालकानेच केला वरातीत डान्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.