Uddhav Thackeray : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे याची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक तोंडावर आल्याने खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमके कोणाला द्यायचे याचा निर्णय लागणे अत्यंत आवश्यक होते.
त्यामुळे आता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाबाबत दोन्ही गटाने हालचाली सुरु केल्या आहेत.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे ठाकरे गटाकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने आम्हाला बाजू मांडू दिली नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करतात निवडणूक आयोगाने निर्णय दिला असल्याचेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, शिंदे गटही निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाकडून चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी आज (सोमवार) दुपारी शिंदे गट निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून चिन्हाबाबत तीन पर्याय पाठवण्यात आले आहेत. यात त्रिशूळ, मशाल आणि उगवत्या सूर्याचा समावेश आहे. निवडणूक आयोग आज पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावावर निर्णय देण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : उद्धव ठाकरेंनी केली नव्या नावाची घोषणा, ‘ही’ तीन नावं पाठवली निवडणूक आयोगाला
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरेंचा मोठा निर्णय, चिन्हासाठी निवडले ‘हे’ तीन पर्याय
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरेंची फक्त दोनच शब्दात तिखट प्रतिक्रिया, म्हणाले
Shivsena : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले; शिवसेना नावाबाबतही घेतला मोठा निर्णय