Share

uddhav thackeray : “कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू…”; मनसेने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं, वाचा नेमकं काय म्हटलं?

uddhav thackeray : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह नेते मंडळींनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील मैदानात उतरले आहेत.

याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने पोटनिवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते. यानंतर शरद पवारांनी देखील मनसेच्या मागणीचे स्वागत करत पाठिंबा दिला. अन् आता नवीन घडामोड घडली आहे.

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या भूमिकेच स्वागत केलं. उद्धव ठाकरेंनी थेट पवारांना पत्र लिहीत, पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यामुळे पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

याचाच धागा पकडत मनसेने उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक ट्विट करत उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. राज ठाकरे यांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये देशापांडे म्हणतात, राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा”.

वाचा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हंटलंय?
‘पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे, हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते,’ असं ठाकरेंनी पत्रात म्हंटलं आहे.

‘स्वर्गीय रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now