उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन इकतेच लोकप्रिय, जावेद अख्तरांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई । राज्यात २०१९ मध्ये मोठे राजकीय नाट्य बघायला मिळाले, आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेने भाजपसोबतचे जुने संबंध तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले, कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली. यामुळे त्यांचे कौतुक होत केले जाते.

आता सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. जावेद अख्तर हे बेधडक वक्तव्यासांठी प्रसिद्ध आहेत. यामुळे ते सतत चर्चेत असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन या मुख्यमंत्र्यांइतकेच लोकप्रिय आहेत, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे, तसेच ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे कठोर टीकाकार सुद्धा त्यांच्याबद्दल मनात कटूता ठेवणार नाहीत. उद्धव ठाकरे अन्याय करत असल्यांचा आरोप त्यांचे विरोधक सुद्धा करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे विरोधकांची देखील बोलती त्यांनी बंद केली आहे.

जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. अनेकांनी ठाकरे सरकारची तुलना तालिबान सोबत केली, यामुळे त्यांना देखील अख्तर यांनी खडेबोल सुनावले आहेत. उद्धव ठाकरे अतिशय उत्तम प्रकारे सरकार चालवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच मी त्या तीन पक्षांपैकी कोणत्याच पक्षाचा सदस्य नाही जे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ते उत्तम प्रकारे सरकार चालवत आहेत. यामुळे महाराष्ट्र पुढे जाईल.

त्यांनी RSS बद्दल एक वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत आले होते. यामुळे भाजपकडून देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांच्या वक्तव्यावर आता विरोध काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.