Maharashtra politics : शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली असतानाच माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एक स्फोटक मुलाखत देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा घात करण्याचा कट उद्धव ठाकरेंकडूनच रचण्यात आला होता.
५ जुलै रोजी मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) कार्यकर्ते एकत्र येऊन विजयाचा जल्लोष करणार असताना, याच पार्श्वभूमीवर कदमांनी आपली भूमिका स्पष्ट करत अनेक खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत.
“राज ठाकरेंच्या जीवावर उठले होते”
कदम यांनी सांगितले की कणकवली (Kankavli) दौऱ्यावेळी राज ठाकरे यांच्यावर घातपाताचा कट रचण्यात आला होता. “त्यावेळी आम्हाला रस्ता बदलून जावा लागला. स्थानिक पोलीस अधीक्षकांनी मुंबईत परतण्यास सांगितले होते,” असं त्यांनी सांगितलं. यामागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
“एकत्र येण्याचा खरा हेतू काय?”
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणजे मराठी माणसाचं भलं होणार का, की त्याचा बळी जाणार?” असा थेट सवाल रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला. त्यांनी दावा केला की जर हे दोन भाऊ एकत्र आले, तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा राजकीय बळी जाईल.
“उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवू नका”
रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फक्त वापरून फेकून देणारे नेते आहेत. त्यांनी आधीही मनसेचे (MNS) नगरसेवक फोडले, राज ठाकरेंच्या मुलाला पराभूत केलं आणि नंतर त्यांच्यावर विश्वासघात केला. “राज ठाकरे यांना मी अश्रूंमध्ये पाहिलं आहे, मातोश्रीतून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते गहिवरले होते,” असा भावनिक दावा त्यांनी केला.
“शरद पवारांना सोडणार का?”
कदम यांनी विचारलं की उद्धव ठाकरे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – Sharad Pawar faction) सोडणार आहेत का? ते म्हणाले, “महापालिका निवडणुकीनंतर मनसेला (MNS) वापरून फेकलं जाईल. हे एक राजकीय नाटक आहे.”
“मराठी माणसाला फसवलं जातंय”
मुंबईत (Mumbai) आज केवळ १० टक्के मराठी लोक उरले आहेत आणि ते ही सर्व पक्षांत विखुरलेले आहेत, असं ते म्हणाले. “शासनाचा जीआर (GR) मागे घेतल्याबद्दल स्वागत, पण पूर्वी त्यावर सह्या कोणी केल्या होत्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“पदावरून काढून टाकण्यात आले”
राज ठाकरे यांच्यासोबत बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवले जात होते. “त्यापैकी मी एक आहे,” असंही कदम यांनी ठणकावून सांगितलं. तसेच “महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) जर राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली असती, तर आज मराठी माणसाचं चित्र वेगळं असतं,” असा दावाही त्यांनी केला.