कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात उद्धव ठाकरे नंबर वन! जाणून घ्या कोणाचा कितवा नंबर

मुंबई । संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषधे देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र या काळात महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी केली असल्याचे एका पोलमधून समोर आले आहे.

एका ज्येष्ठ पत्रकाराने काही दिवसांपूर्वी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण होते.? हे जाणून घेण्यासाठी घेतलेल्या ट्विटरवरील जनमत चाचणीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक म्हणजेच ६२ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत.

यामुळे उद्धव ठाकरे हेच कोरोना परिस्थिती हाताळण्यात यशस्वी ठरलेत हे सिद्ध झाले आहे. याबाबत शिवसेना समर्थकांकडून या पोलचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल केले जात आहेत. यावरून भाजपवर टीका केली जात आहे.

हा पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी घेतला आहे. कोरोना काळात चांगल्या पद्धतीने काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण असा ट्विटर पोल घेण्यात आला होता. यावर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वोत्तम नियोजन केले?, असा प्रश्न यामध्ये विचारला गेला. यामध्ये ६२.५ टक्के मत ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के मते मिळाली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ४९ टक्के मत मिळाली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ४८.५ टक्के मत मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या वाट्याला १.७ तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केवळ ०.५ टक्के मतं मिळाली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना १.३ टक्के मत मिळाली आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यामध्ये आघाडीवर आहेत. यामुळे भाजपवर आता शिवसेनेचे कार्यकर्ते टीका करत आहेत.

ताज्या बातम्या

तुमच्या बँक खात्यातून कट होणार १२ रुपये, बदल्यात मिळणार २ लाख, जाणून घ्या…

….म्हणून सुशील कुमारने हत्येदरम्यान स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड केला, पोलिसांची धक्कादायक माहिती

धक्कादायक! मुंबईत आमदाराच्या पत्नीचा ब्रीजवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.