“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान

मुंबई | भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.

मुनगंटीवार-ठाकरे भेटीनंतर राजकीय चर्चा रंगलेल्या असताना यात मुनगंटीवार यांनी भेटीनंतर केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली. ‘उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ते सोनिया गांधी यांच्या दबावाखाली येणार नाहीत,’ असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

भाजप आणि शिवसेना हे पक्ष एकमेकांचे शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत, असे वक्तव्यही मुनगंटीवार यांनी केले आहे. या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना मुनगंटीवारांनी म्हटले की, ‘शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा कायमचा शत्रू नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजपा यांची २५ वर्षांची युती तुटली होती, पण अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो.’

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत. भाजप आणि शिवसेनेचं काय होते ते पुढे बघू. हिंदुत्वाचा आणि जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षांना ऐकावा लागेल’, असेही मुनगंटीवारांनी यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’
मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश
लग्नानंतर मिसेस चांदेकरांचा मेकओव्हर; फोटो पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.