कंनगा राणावतबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, सोडून द्या..

मुंबई | सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या मुलाखतीत कंगना राणावतबद्दल प्रश्न विचारला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, ‘ते सोडून द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही, त्यावर बोलायला मला वेळही नाही. हा मुंबईकरांचा अपमान आहे आणि अशा तिने वर्णन केलेल्या मुंबईवर तुम्ही भगवा फडकवणार आहात? तोही म्हणे शुद्ध. सोडून द्या.’

तसेच या मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की हात धुवा असे सांगण्यापलीकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलंय? याचे उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अगदी नकळत भाजपवर निशाणा साधला आहे.

हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावरुनच उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवाल केला.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगणा राणावत चांगलीच चर्चेत आली आहे. या प्रकरणी ठाकरे सरकारला आणि शिवसेनेला कंगणाने चांगलेच धारेवर धरले होते. तसेच मुंबई पोलिसांबद्दल देखील कंगणाने वादग्रस्त विधाने केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील
‘अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं’
स्वत:ला आवरा; कोर्टाने कंगनाची केली कानउघडणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.