पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यामुळे राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखण्यात आल्या आहे. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला होता.

मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधल्यानंतर विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर टिका केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना साडेसोड उत्तर दिले आहे. टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

पत्नी रुग्णालयात आहे, मुलगा कोविडशी झगडतोय, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र संभाळतोय, टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना उतर दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी भाषणात कोरोना वाढल्याची कारणे सांगितली नाही, उपाययोजना सांगितल्या नाही, मुख्यमंत्र्यांचे भाषण कशासाठी होते, तेच कळले नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना शेवटच्या घटकाचा विचार पण विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं, फक्त जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, असेही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.