Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकारण सध्या खूपच खालच्या स्तरावर जाऊन पोहचले आहे. राज्यातील राजकारणी आता सुसंस्कृतपणा विसरलेले आहेत. राजकारणात कधीही कोणावर वयक्तिक टीका करू नये. असा अलिखित नियम आहे आणि हा राजकीय शिष्टाचाराचा पण भाग आहे.
पण राज्यात मागच्या 3 महिन्यापासून ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. तेव्हापासून सर्वच पक्ष राजकीय शिष्टाचार विसरून गेले आहेत. पक्षही अशाच लोकांना पुढे करत आहे, ज्यांच्या भाषेत असा शिवराळ पणा आहे. सध्या महाराष्ट्रात ठाकरे गट आणि शिंदे गट हा वाद सुरु आहे.
दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर वयक्तिक पातळीवर जाऊन आरोप लावत आहेत. अशातच भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते नारायण राणे आणि नितेश राणे यांची नक्कल करतांना दिसले होते. आणि त्यांचा कोबडी चोर असा पण उल्लेख केला होता.
आता नितेश राणेंनी याला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी अतिशय शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरेंचा नपुंसक असा उल्लेख केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हा नपुंसक आहे, त्याच्यात थेट हल्ला करण्याची हिम्मत नाही.
ते पुढे बोलतांना म्हणाले, त्यामुळेच उद्धवला भास्कर जाधवसारख्या भोकणाऱ्या कुत्र्यांची एक फौज लागते. त्याच्यात तर हिम्मत नाही. त्यामुळे तो अशा भोकणाऱ्या कुत्र्यांना पुढे करतो. त्यांनी आपल्या संबोधनात सर्वाचाच एकेरी शब्दात उल्लेख केला.
सोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंना आईसक्रीमचा कोन आवडतो म्हणून निवडणूक आयोगाने त्यांना आईसक्रीमचा कोन निवडणूक चिन्ह म्हणून दिले आहे. अशी मिश्कील टीका पण त्यांनी केली. पत्रकार परिषेदेत नितेश राणे खूपच आक्रमक झाले होते. त्यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
महत्वाच्या बातम्या
ramayana movie : ‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध
Shraddha Kapoor : …त्यामुळे शक्ती कपूर यांनी मुलगी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते
CBI : CBI ची आपच्या शिसोदीयांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; देशाच्या राजकारणात खळबळ