Share

Uddhav Thackeray: मार्क मिळाले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एक नंबर! या शंभर मार्कांत तिने EVM वापरलं होतं का? : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : राज्य सरकारकडून पहिलीपासून हिंदी शिकवण्याचे दोनही शासन निर्णय रद्द करण्यात आल्याने मराठी जनतेच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही एकजूट केवळ मोर्च्यापुरती नव्हे, तर मातृभाषेच्या रक्षणासाठी असावी. त्यामुळेच येत्या ५ जुलै रोजी विजय उत्सव जरूर होणार आहे.”

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी (Monsoon Session 2025) उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, “सरकारने खरोखर शहाणपण दाखवलं का, हे वेळच दाखवेल. मात्र या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली – मराठी माणसाला बाजूला ठेवता येत नाही.”

“कमळी कोण? तिला EVMमुळे मार्क मिळाले का?” 

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका करत विचारलं, “मला उत्सुकता आहे, ही ‘कमळी’ कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? कारण तिला मिळाले १०० पैकी १०० मार्क! त्या शाळेत EVM वापरली गेली होती का? आणि कमळीला एक नंबर म्हणणारे कोण आहेत, हे मी पाहणारच!”

“सरकारचा डाव फसला, जीआर मागे घ्यावा लागला”

ठाकरे यांनी सांगितले की, सरकार मराठी-इतर भाषिकांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र ही एकजूट पाहून त्यांना जीआर मागे घ्यावा लागला. शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse – Education Minister, Maharashtra) यांनी भेट दिली होती, मात्र मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं – “ऐकून घेईन, पण ऐकणार नाही.”

 ठाकरे यांचा सवाल

शिक्षणासारख्या संवेदनशील विषयासाठी सरकारने अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव (Narendra Jadhav – Economist) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “या विषयावर थट्टा नको. समिती कोणत्याही क्षेत्रातील असो, पण सक्तीचा विषय आता संपला आहे.”

उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेचे, आणि आंदोलनात सहभागी सर्व पक्षीय नेत्यांचे आभार मानले. “मातृभाषा कोणत्याही पक्षापेक्षा मोठी आहे. सर्वांनी राजकीय भेद विसरून उभा राहिलात, याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे,” असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now