लढा कोरोना विरुद्ध ! कोरोनावरील लस कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली वेळ

पुणे | पुण्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत स्वतंत्र कोव्हिड सेंटर तसंच वैद्यकिय व्यवस्था उभी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत होती.

या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोव्हिड सेंटर फक्त १८ दिवसांत बांधून पूर्ण केलं आहे. याच कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत,’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ‘आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ अशा सूचना त्यांनी यावेळी येथे बोलताना दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.